Accident: खासदार हीना गावित यांच्या गाडीचा अपघात
Accident: दुभाजकावर वाहन धडकल्याने खासदार हीना गावित जखमी.
नंदुरबार : दुचाकीस्वार महिलेला वाचविताना खासदार डॉ. हीना गावित यांचे चारचाकी वाहन दुभाजकाला धडकल्याने त्यांच्यासह दुचाकीस्वार महिलेसह तीनजण जखमी झाल्याची घटना रविवारी दुपारी नंदुरबारात घडली. खासदार गावित यांच्यावर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
खासदार डॉ. हीना गावित या रविवारी दुपारी नंदुरबार येथील एका कार्यक्रमाला जात असताना अचानक समोर आलेल्या दुचाकीस्वार महिलेला वाचविण्याच्या प्रयत्नात गावित यांची गाडी दुभाजकावर जाऊन आदळली. त्यात खासदार गावित यांना हाताला व पायाला किरकोळ दुखापत झाली. महिलादेखील जखमी झाली. स्वतः खासदारांनी तातडीने रुग्णवाहिका बोलावून जखमी महिलेला रुग्णालयात पाठवत त्यांना धीर दिला.
Web Title: Car accident of MP Heena Gavit