आश्रमशाळा अधीक्षकाने केला अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
महिनाभरापूर्वीच दाखल केले होते आश्रमशाळेत, अधीक्षकाने चक्क चाकूच्या धाकावर लैंगिक अत्याचार (Sexually abused).
हिंगणघाट (जि. वर्धा) : आठव्या वर्गात शिकणाऱ्या १३ वर्षीय मुलीवर भद्रावती तालुक्यातील एका खासगी आश्रम शाळेतील अधीक्षकाने चक्क चाकूच्या धाकावर लैंगिक अत्याचार केल्याचे खळबळजनक प्रकरण हिंगणघाट पोलीस ठाण्यात | पोहोचल्यावर रविवारी उजेडात आले. हिंगणघाट पोलिसांनी आरोपी अधीक्षक संजय एकनाथ इटनकर (५३) याच्याविरुद्ध अत्याचाराच्या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पण घटनास्थळ भद्रावती पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असल्याने है प्रकरण पुढील तपासासाठी भद्रावती पोलिसांकडे वळते करण्यात आले आहे. विशेष म्हणजे पीडितेचे आई वडील चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवासी असून ते दोघेही दोन महिन्यांपूर्वी हिंगणघाट येथे रहायला आले आहेत. मुलीची प्रकृती बिघडल्याची माहिती मिळाल्यावर पीडितेच्या वडिलांनी आश्रमशाळा गाठली आणि मुलीला हिंगणघाट येथे आणले. त्यानंतर मुलीच्या पोटाखाली दुखत असल्याचे तिने शेजारील महिलेला सांगिल्यावर हा धक्कादायक प्रकार पुढे आला.
मुलीला चांगले शिक्षण मिळावे या हेतूने पीडितेच्या आई-वडिलांनी तिला चंद्रपूर जिल्ह्याच्या भद्रावती तालुक्यातील एका खासगी आश्रमशाळेत ७ जुलै रोजी टाकले. पण पीडितेच्या हिंगणघाट येथील एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या वडिलांना ४ ऑगस्टला तुमच्या मुलीची प्रकृती खराब आहे, तिला व तिचा शाळा सोडल्याचा दाखला तुम्ही घेऊन जा, असे शाळेतून सांगण्यात आले. पण सततच्या पावसामुळे पीडितेचे वडील आश्रमशाळेत थोडे उशीरा पोहोचले. मुलीला सोबत घेऊन हिंगणघाटला परतल्यावर अधीक्षकाने लैंगिक अत्याचार केल्याचे पुढे आले.
Web Title: Ashram school superintendent sexually abused a minor girl