चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीला विहिरीत ढकलून खून केल्याप्रकरणी पतीस जन्मठेप
Karjat News: शेतातील विहिरीतील पाण्यातील मोटार बाहेर काढण्याचा बहाणा करून विहिरीत ढकलून दिले (Murder).
कर्जत: पत्नीचा खून केल्याप्रकरणी चखालेवाडी (ता. कर्जत) येथील पतीस श्रीगोंदा येथील जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिन्यांची साधी कैद, असे शिक्षेचे स्वरूप आहे.
सुरेश सिद्धू खटके (वय ३५, रा. चखालेवाडी, ता. कर्जत), असे शिक्षा झालेल्या पतीचे नाव आहे.
कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चखालेवाडी (पोस्ट बिटकेवाडी) गाव शिवारात आरोपी सुरेश सिद्धू खटके याच्या शेती गट नं. २८७ मधील शेतातील विहिरीत १२ जून २०२० रोजी दुपारी खुनाची घटना घडली होती. सुरेश खटके याने त्याची पत्नी आरती सुरेश खटके (वय ३०) हिच्या चारित्र्यावर वारंवार संशय घेतला. तिला वेळोवेळी मारहाण व शिवीगाळ केली. ठरल्या. तिच्या विषयी मनात राग धरून तिला शेतातील विहिरीतील पाण्यातील मोटार बाहेर काढण्याचा बहाणा करून विहिरीत ढकलून दिले. तिला पोहता येत असल्याने विहिरीतील पाण्यात उडी घेऊन तिला पाण्यात बुडवून सुरेश खटके याने मारले, असे फिर्यादीत म्हटले आहे.
या गुन्ह्याचा तपास पूर्ण झाल्यानंतर आरोपीविरुद्ध सहायक पोलीस निरीक्षक एस. पी. माने यांनी न्यायालयात देषारोपपत्र दाखल केले. खटल्याची सुनावणी जिल्हा न्यायाधीश मुजीब. एस. शेख यांच्या न्यायालयात झाली. खटल्यामध्ये सरकार पक्षाच्या वतीने एकूण दहा साक्षीदार तपासण्यात आले. त्यामध्ये फिर्यादी, स्वतंत्र साक्षीदार, वैद्यकीय अधिकारी, तपासी अधिकारी व पंच साक्षीदार यांच्या साक्षी महत्त्वाच्या
खटल्यामध्ये सरकार पक्षाच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील संगीता अनिल ढगे यांनी काम पाहिले. न्यायालयासमोर आलेला साक्षी पुरावा व सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने शिक्षा सुनावली.
Web Title: Life imprisonment for murderi his wife by pushing her into a well due to doubting her character