अकोले: अगस्ती सहकारी साखर कारखाना निवडणूकीची सुनावणी पुढे ढकलली
Akole Agasti Election: सुनावणी पुढील आठवडयात होणार.
अकोले: अगस्ती सहकारी साखर कारखाना निवडणूकीची सुनावणी औरंगाबाद न्यायालयात आज ५ ऑगस्ट २०२२ रोजी होणार होती. मात्र ही सुनावणी पुढील आठवडयात होणार आहे.
अगस्ती सहकारी साखर कारखाना संचालक मंडळ निवडणूक तातडीने घेण्यात यावी यासाठी याचिकाकर्ते अॅड. अजित काळे व सहकारी अँड. अनिकेत चौधरी यांनी ही सुनावणी आज होणार होती, मात्र न्यायालयीन कामकाज जास्त असल्यामुळे अगस्ती सहकारी साखर कारखाना निवडणूकीची सुनावणी ही पुढील आठवडयात केव्हाही होवु शकते, असे विश्वसनीय सुत्रांकडून समजते. खरेतर अगस्ती सहकारी साखर कारखाना निवडणूक शेवटच्या टप्यात असल्यामुळे ही निवडणूक होवुन अगस्ती सहकारी साखर कारखाना गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी नुतन संचालकांना संधी मिळाली असती तर अगस्तीचे भवितव्य अवलंबुन असते. राज्य सरकारने अतिवृष्टीचा बहाना करत २९ सप्टेंबर २०२२ पर्यंत पुढे ढकलून एक प्रकारे सहकारी संस्थांना स्पीड ब्रेकर निर्माण केला असला तरी न्यायालयामध्ये तारीख पे तारीख हाचा फॉर्मुला २९ सप्टेंबर पर्यंत सुरु राहील अशी चर्चा देखील सभासद वर्गामध्ये सुरु आहे. आज अगस्ती बाबत संभाजीनगर न्यायालयात नक्कीच मार्ग निघेल अशी अपेक्षा नेते व सभासदांना होती.
मात्र पुढील आठवडण्यातील तारीख देखील निश्चित नाही मात्र सुनावणी पुढील कोणीही रिस्क घेण्यास तयार नाही. आठवडयात होवू शकते असे विश्वसनीय सुत्रांकडून समजते. एक मात्र खरे अगस्ती सहकारी साखर कारखाना निवडणूक जेवढी आहे. लांबणीवर पडेल तेवढे नुकसान अगस्तीचे होवू शकते अशी चर्चा होत आहे.
Web Title: Agasti Cooperative Sugar Factory election hearing adjourned