Accident: बस उलटल्याने अपघातात ३९ जखमी
Akkalkot Accident: अपघाग्रस्तांना प्रत्येकी ५०-५० हजार रुपयांची मदत- मुख्यमंत्री.
अक्कलकोट: गाणगापूर रोडवरील बाह्य एमआयडीसीच्या पुढे वळणावर रविवारी सकाळी सव्वादहा वाजण्याच्या सुमारास सोलापूर आगाराची गाणगापूर एसटी बस उलटली. बसमध्ये वाहक- चालकासह एकूण ३९ प्रवासी होते, त्यात सर्व जण जखमी झाले आहेत. सर्व जखमींना उपचारासाठी अक्कलकोट ग्रामीण रुग्णालय आणि एका खासगी रुग्णालयात दाखल केले. गंभीर जखमींना सोलापूरच्या
शासकीय रुग्णालयात हलवले. एसटीचे (एमएच ०७ सी ९१८४) मोठे नुकसान झाले. या घटनेची अक्कलकोट शहर पोलिसांत नोंद करण्यात आली. चालक अमोल इंद्रजित भोसले, वाहक मीना मुकुंद गायकवाड हे देखील जखमी आहेत.
मुख्यमंत्री शिंदेंकडून रुग्णांची फोनवरून चौकशी
आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी या अपघाताची माहिती मुख्यमंत्री शिंदेंना दिली. अपघातात जखमींना मदतीचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. जिल्हाधिकाऱ्यांनीही तत्काळ जखमींची भेट घेऊन माहिती सादर करण्याच्या सूचना केल्या. मुख्यमंत्र्यांनी अपघाग्रस्तांना प्रत्येकी ५०-५० हजार रुपयांची मदत जाहीर केल्याचे आमदार कल्याणशेट्टी यांनी यावेळी सांगितले.
Web Title: 39 injured in bus overturn accident