२९९ आणि ३९९ रुपयांत मिळवा १० लाखांचा विमा, पोस्टाची योजना, जाणून घ्या सविस्तर
Postal Department Insurance 10 lakhs insurance is available at Rs 299 and Rs 399.
अहमदनगर: महागड्या प्रीमियममध्ये विमा काढू न शकणाऱ्या गरीब लोकांसाठी पोस्ट विभागाने सुरक्षा का पहला कदम नावाची विमा योजना अंमलात आणली आहे. (Post office new insurance Scheme for Accident)
या विमा योजनेत लाभार्थीचा वर्षभरात फक्त २९९ आणि ३९९ रुपयांच्या प्रीमियमसह १० लाख रुपयांचा विमा उतरवला जाणार आहे. इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक आणि टाटा एआयजी यांच्यातील आहे. करारानुसार १८ ते ६५ वर्षे वयोगटातील लोकांना या योजनेनुसार अपघात विमा संरक्षण मिळेल. याअंतर्गत अपघाती मृत्यू कायमचे किंवा आंशिक पूर्ण अपंगत्व, अर्धागवायू झाल्यास दोन्ही प्रकारचे विमा संरक्षण १० लाख रुपयांचे संरक्षण मिळेल. एक वर्ष संपल्यानंतर पुढील वर्षी या विम्याचे नूतनीकरण करावे लागेल. यासाठी पोस्ट विभागाच्या इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत लाभार्थीचे खाते असणे बंधनकारक आहे.
काय आहे २९९ ची पॉलिसी
२९९ रुपयांचा विमा अपघाती मृत्यू, कायमचे पूर्ण अपंगत्व किंवा कायमचे आंशिक अपंगत्व यावर १० लाख रुपयांचे संरक्षण प्रदान करेल. यासोबतच २९९ रुपयांच्या या विम्यामध्ये अपघात उपचारासाठी ६० हजार रुपयांपर्यंतचा आयपीडी खर्च आणि ओपीडी क्लेममध्ये ३० हजार रुपयांपर्यंतचा खर्च उपलब्ध होणार.
३९९ ची पॉलिसी काय?
३९९ रुपयांच्या प्रीमियममध्ये अपघाती मृत्यू, कायमचे पूर्ण अपंगत्व किंवा १० लाख रुपयांचे कायमचे आंशिक अपंगत्व, आयपीडी वैद्यकीय दाव्यासाठी ६० हजार रुपयांपर्यंत खर्च, ३० हजारांपर्यंत ओपीडी दावा, तसेच दोन मुलांच्या शिक्षणासाठी १ लाख रुपयांपर्यंतचा समावेश आहे. त्याचबरोबर रुग्णालयाच्या खर्चासाठी १० दिवस प्रतिदिन एक हजार रुपयेदेखील मिळतील. कुटुंबाला वाहतुकीसाठी २५ हजार रुपयांपर्यंतचा खर्चदेखील मिळणार आहे. कोणत्याही कारणाने अपघातात व्यक्तीचा मृत्यू झाल्यास अंतिम संस्कारासाठी ५ हजार रुपये मिळतील
योजनेचा कालावधी किती?
या योजनेचा कालावधी हा एक वर्षांचा आहे. एक वर्ष संपल्यानंतर पुढील वर्षी तुमच्या जवळच्या कोणत्याही या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन विमा योजनेचे नूतनीकरण करावे लागेल.
अर्ज कसा करणार?
या विमा योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर पोस्ट पेमेंट बँकेत चालू | खाते असणे आवश्यक आहे. नसेल तर नव्याने खाते काढून या योजनेचा लाभ घेता येईल.
काय कव्हर होईल?
सर्व प्रकारचे अपघात, सर्पदेश, विजेचा शॉक, गाडीवरून पडून अपघात, कायमचे किंवा आंशिक अपंगत्व, अर्धांगवायू झाल्यास १० लाख रुपयांचे संरक्षण मिळेल.
Web Title: Postal Department Insurance 10 lakhs insurance available at Rs 299 and Rs 399