भोजापूर धरण ओवरफ्लो, जाणून घ्या धरणांची पाण्याची स्थिती
Bhojapur Dam Overflow Today: भोजापूर धरण आज पूर्ण क्षमतेने भरले आहे.
अकोले: आठ दिवसांपासून सुरू असलेला पावसाचा जोर ओसरला आहे. असे असले तरी डोंगरदर्यातून अजूनही पाणी येत असल्याने भंडारदरा धरणातील पाणीसाठा ७७.७९ टक्क्यांवर पोहचला आहे. ११०३९ दलघफू क्षमतेच्या या धरणात काल सायंकाळी पाणीसाठा ८५८७ दलघफू झाला होता.
निळवंडे धरणातील पाणीसाठा ८५८७ (७३.४७) दलघफू पाणीसाठा झाला होता. याधरणातून प्रवरा नदीत २३०० क्यसेकने पाणी सोडण्यात येत आहे. भोजापूर धरण आज सकाळी क्षमतेने भरले आहे. यंदा मुबलक पाणीसाठा असल्याने लाभक्षेत्रात समाधानाचे वातावरण आहे.
आज सकाळी ६ वाजता धरणांची स्थिती.
१)भंडारदरा:(ए)::८५८७ ७७.७९%
२)निळवंडे::::::(ए)::६११३ ७३.४७%
३)मुळा:(ए):::::::१४७०४ ५६.५५%
४) आढळा:(ए):::::::१०६० १००% ओव्हरफ्लो
५)भोजापुर::(ऊ):::::::::::३६१ १००% ओव्हर फ्लो
Web Title: Bhojapur Dam Overflow Today