Home संगमनेर संगमनेर: घारगाव बसस्थानक परिसरात अज्ञात इसमाचा मृतदेह आढळल्याने खळबळ

संगमनेर: घारगाव बसस्थानक परिसरात अज्ञात इसमाचा मृतदेह आढळल्याने खळबळ

Sangamner Found Dead body: मृतदेहाची अद्याप ओळख पटलेली नाही. 

Dead body of an unknown person was found in the Ghargaon bus stand area

संगमनेर: संगमनेर तालुक्यातील पठार भागातील घारगाव (Ghargaon) बस स्थानक परिसरात असलेल्या बोगद्यात अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. गुरुवारी दिनांक १४ जुलैला दुपारी चार वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की,घारगांव बस स्थानक परीसरात नागरीकांना ये जा करण्यासाठी महामार्ग प्रशासनाकडून बोगदा तयार करण्यात आला आहे तर हा बोगदा अनेक नागरीक सुरवातीच्या काळात ये जा करण्यासाठी वापरत होते. त्यानंतर या बोगद्यात बसविण्यात आलेले लाईट चोरट्यांनी चोरून नेले त्यानंतरच्या काळात या बोगद्यात संपुर्ण अंधार राहत होता. त्यामूळे जा ये करण्याची वर्दळ कमी झाली होती. त्यामुळे या बोगद्याकडे कुणी फिरकतही नव्हते.

एका व्यक्तीला बोगद्यातून जात असताना त्याला अज्ञात एका ५० वर्षीय इसमाचा मृतदेह आढळून आला. याबाबतची माहिती त्याने इतर नागरीकांना देताच परीसरात बघ्यांची गर्दी झाली. सदर माहिती घारगांव पोलिसांना समजताच घारगांव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल राजेंद्र लांघे यांनी घटनास्थळी धाव घेतली व  मृतदेह खासगी रुगणवाहीकेतून संगमनेर येथील कुटीर रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. 

Web Title: Dead body of an unknown person was found in the Ghargaon bus stand area

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here