राजूर पोलिसांना खळबळून जाग, राजूर पोलिसांकडून सिंघम स्टाईलने कारवाई
राजूर पोलिसांना खळबळून जाग, राजूर पोलिसांकडून सिंघम स्टाईलने कारवाई
ललित मुतडक राजूर प्रतिनिधी :- राजूर पोलिसांना खळबळून जाग आली,तर यावर राजूर पोलिसांकडून सिंघम स्टाईलने कारवाई करण्यात आली.पोलिसांचा रोडरोमियोनवर चालला हंटर.
याविषयी सविस्तर वृत्त असेकी,धूम स्टाईलने दुचाकी चालविणारे व काही टवाळ,टारगट व नोलिमीट,रोडरोमियोगिरी करणाऱ्यांकडून कर्णकर्कश हॉर्न तसेच दुचाकीच्या सायलेंन्सरच्या आवाजाने राजूर व राजूर परिसरातील नागरिक त्रस्त झाले होते.टारगट व धूम स्टाईलने दुचाकी चालविणारे स्वार रस्त्यावर गाडी जोरजोरात रेस करून कानठळ्या बसतील असा सायलेन्सरचा व हॉर्नचा कर्णकर्कश आवाज आचारासंहिता सुरू असताना भंग पावली जाऊ नये याची या लोकांनी काळजी न घेतल्यामुळे असे कृत्य करत असतानाचे लक्षात येताच व त्यामुळे जेष्ठ नागरिकांना व वयोवृद्ध व्यक्तींना याचा त्रास मोठ्या प्रमाणात होत होता.या आवाजाने लोकांचे लक्ष विचलित होतेच,बरोबर ध्वनिप्रदूषणही होत होते.तसेच या वाहनांवर प्रेस व पोलीस नाव व लोगो विनाकारण लावलेले होते याचा त्रास पत्रकारांना देखील होत होता हे नजरेस आले होते.यावर देखील विचारणा करून ती बाब सत्य आहेकी असत्य हे आढळून आल्यास त्यावर योग्य ती कारवाई करावी,अशी मागणी राजूर शहरातील ग्रामस्थ व व्यापारी वर्गातून करण्यात आली होती.याची भनक दैनिक लोकवेध वृत्तास लागताच दैनिक लोकवेध कडून वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते.त्यावर राजूर पोलिसांनी गल्ली बोळातील अवैध पद्धतीने धंदा करणाऱ्या,ऑनलाइन दारू विक्री,रस्त्याने चालणाऱ्या चोरट्या पध्द्तीने मटका,जुगार,गांजा व दारूची विक्री,दारूचे सेवन करून दुचाकी चालवणाऱ्यांवर,हेल्मेट,रोडरोमि योगिरी,
दुचाकी व काळी पिवळी टॅक्सी,तसेच फॅन्सी नंबर प्लेट,नंबर प्लेटच्या जागी प्रेस नाव असणाऱ्या दुचाकींवर,विना नंबरच्या दुचाकी,रोडच्या कडेचे स्टॉल तसेच रोडच्या कडेच्या दुकानांच्या नावाचे लावलेले बॅनर(फ्लेक्स)भारतीय स्टेट बँक समोरील व राजूर बस स्थानक परिसरातील नो-पार्किंगमध्ये लावलेल्या दुचाकी,काळी पिवळी टॅक्सी व फळ विक्री करणाऱ्यां हातगाड्यांवर,ट्रिपल शीट,टवाळ व नोलिमिटमध्ये चालवणाऱ्यांवर कारवाई करून दंड वसूल करण्यात आला.यावेळी राजूर पोलिसांनी गेल्या दोन दिवसामध्ये एकूण पन्नास दुचाकी व अन्य गाड्यांवर सिंघम स्टाईलने धडक व कडक कारवाई केली.
सध्या राजूर परिसरात कडेकोट कारवाई होत असल्याने रोडरोमियो,धूम स्टाईलने दुचाकी चालवणारे,अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये, सायलेन्सरचा व हॉर्नचा कर्णकर्कश आवाज काढणाऱ्यांमध्ये घबराटीचे व भीतीचे सावट पसरलेले आहे.कायदा हा सर्वांना समान आहे त्याचे उल्लंघन केल्यास कार्यवाईला सर्वांना सामोरे जावे लागेल मग तो कोणीही असो मग तो सरकारी कर्मचारी,पोलीस अधिकारी असो,तहसीलदार,ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक,सरपंच,पोलीस पाटील किंवा पत्रकार असो सर्वांना कायदा हा समान आहे.गेल्या दोन दिवसांमध्ये राजूर पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक पी.वाय.कादरी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सहकाऱ्यांनी स्वतः राजूर व परिसरात सिंघम स्टाइलने वाहनधारकांवर केली कारवाई तसेच गल्ली बोळातील अवैध धंदे,अवैध प्रकारे वाहतूक करणाऱ्या वाहनांवर सिंघम स्टाईलने छापे टाकत केली कडक व धडक कारवाई.त्यामुळे राजूर व राजूर परिसरातील लहान बाळांनी व जेष्ठ वयोवृद्ध व्यक्तींनी घेतला आनंदाने मनमोकळा श्वास.
Website Title: Rajur Police Singham style Action
Latest: Sangamner News, Akole News, And Entertainment News
अहमदनगर जिल्ह्यातील No-1 अप्प: आजच Google Play Store ला जाऊन डाउनलोड करा – Sangamner Akole News.