अकोले तालुक्यात सलग तिसऱ्या दिवशी सर्वदूर पाउस, वाचा तालुक्यातील एकूण पावसाची नोंद
Akole | अकोले: शहर व तालुक्यात सर्वदूर, सलग तिसऱ्या दिवशी जोरदार पावसाने हजेरी लावली. निळवंडे धरण परिसरात ६८. तर अकोले शहर परिसरात ४७ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद रविवारी सकाळी झाली. जिल्ह्याची चेरापुंजी घाटघर रतनवाडी भागांत मोठ्या, मुसळधार पावसाची आस असून भंडारदरा-निळवंडे धरण पाणलोट क्षेत्रातही मान्सून सक्रिय झाला आहे.
या पावसाने काही वेळातच रस्ते, शेते जलमय झाली होती. शुक्रवार, शनिवार व रविवार दुपारनंतर तालुक्यातील बहुतांश भागांत जोरदार पावसाने हजेरी लावली. शनिवारी सायंकाळी सुमारे अर्धा-पाऊण तास धो-धो पाऊस बरसला. काही वेळातच शहरातील गटारी ओसंडून वाहू लागल्या आहेत.
२६ जून एकूण पावसाची नोंद
ठिकाण पावसाची नोंद मिलिमीटरमध्ये
घाटघर: ३० ३४९
रतनवाडी: ४३ ३९४
पांजरे: २२ १८२
भंडारदरा : २० १४१
वाकी : १२ ८८
निळवंडे: ६८ २४६
अकोले: ४७ १५३
आढळा: १५ ६१
कोतूळ: ०५ २७
Web Title: Rain for the third day in a row in Akole taluka