Rape | धक्कादायक घटना: पाणी मागण्याच्या बहाण्याने घरात घुसून अल्पवयीन मुलीवर बलात्कार
Satara |सातारा: पाणी मागण्याच्या बहाण्याने घरात शिरून एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार (rape) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी सातारा शहर पोलिसांनी एका युवकाला अटक केली आहे.
रसिक अनिल धोत्रे वय २० रा. इंदिरानगर सातारा असे अटक झालेल्या युवकाचे नाव आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, पिडीत १६ वर्षाची मुलगी २१ मे रोजी घरात एकटी होती. त्यावेळी दुपारी दीड वाजेच्या सुमारास रसिक धोत्रे हा पिडीत मुलीच्या घरी गेला. घराच्या बाहेर येऊन त्याने मला पाणी दे सांगितले. त्यावेळी मुलगी घरात पाणी आणण्यासाठी गेली असता रसिकने अचानक घरात येऊन दरवाजाची कडी आतून लावली. त्यानंतर मुलीला मारहाण करीत बलात्कार केला. त्यानंतर तेथून तो पसार झाला. याप्रकारामुळे मुलगी घाबरून गेली. त्यामुळे तिने हा प्रकार कुणाला सांगितला नाही. परंतु पुन्हा असा प्रकार कोणाबरोबर घडेल या भीतीने तिने धाडस करीत पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचा निर्णय घेतला. तिच्या तक्रारीवरून ६ जून रोजी रसिक धोत्रेवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास अटक करण्यात आली.
Web Title: Rape of a minor girl by breaking into a house under the pretext of asking for water