माझ्याशी संबंध ठेवले नाही तर मी तुझ्या नवर्याला ठार करील अशी धमकी देत महिलेबरोबर…
Ahmednagar | पाथर्डी | Pathardi: शेळ्या घेऊन चारण्यासाठी शेतात जाणार्या एका महिलेचा विनयभंग (Molestation) केल्याचा प्रकार समोर आला आहे. पाथर्डी तालुक्यातील माळेगावात ही घटना घडली आहे. या प्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सिध्दार्थ अर्जुन थोरात (रा. दुलेचांदगाव, ता. पाथर्डी) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला एकटीच त्यांच्या शेतात शेळ्या घेऊन चारण्यासाठी जात असताना पीडित महिलेच्या ओळखीचा सिध्दार्थ अर्जुन थोरात हा महिलेच्या जवळ आला. तुझ्याशी बोलायचे आहे असे म्हणत त्याने महिलेची छेड काढली.
पीडित महिला शेळ्या घेऊन जाऊ लागली असता, थोरात याने महिलेस शिवीगाळ करून लाकडी काठीने हातावर, पायावर मारहाण करून महिलेस जखमी केले. यावेळी महिलेने आरडाओरडा केल्याने थोरातने तेथून पळ काढला. माझ्याशी संबंध ठेवले नाही तर मी तुझ्या नवर्याला ठार करील, अशी धमकी त्याने दिली. अशी फिर्याद पीडित महिलेने दिली आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक अनिल बडे तपास करीत आहेत.
Web Title: Molestation of a woman going to the field to graze goats