Home अहिल्यानगर राज्याचा १२ वीचा विभागानुसार निकाल, नगरचा इतका टक्के निकाल- Ahmednagar HSC Result...
राज्याचा १२ वीचा विभागानुसार निकाल, नगरचा इतका टक्के निकाल- Ahmednagar HSC Result 2022

अहमदनगर | Ahmednagar HSC Result 2022: राज्य शिक्षण मंडळाकडून इयत्ता बारावीचा निकाल आज जाहीर झाला असून राज्याचा एकूण निकाल ९४.२२ टक्के इतका लागला आहे. कोकण विभागाने बाजी मारली आहे. कोकण विभाग अव्वल ठरला आहे. कोकण विभागातून सर्वाधिक ९७.२१ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा लागला असून ९०.९१ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
नगर जिल्ह्याचा निकाल ९४.४१ टक्के निकाल लागला असून पुणे विभागात दुसऱ्या स्थानावर मुसंडी मारली आहे.
राज्याचा विभागानुसार बारावीचा निकाल:
कोकण: ९७.२० टक्के
पुणे: ९३.६१ टक्के
नागपूर: ९६.५२ टक्के
औरंगाबाद: ९४.९७ टक्के
मुंबई: ९०.९१ टक्के
कोल्हापूर: ९५.०७ टक्के
अमरावती: ९६.३४ टक्के
नाशिक: ९५.०३ टक्के
लातूर: ९५.२५ टक्के
Web Title: Ahmednagar HSC Result 2022

















































