Home महाराष्ट्र पबमध्ये पार्टीसाठी गेलेल्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर मर्सिडीज कारमध्ये सामूहिक बलात्कार- Gang...

पबमध्ये पार्टीसाठी गेलेल्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर मर्सिडीज कारमध्ये सामूहिक बलात्कार- Gang Rape Case

17-year-old girl who went to a party in a pub was gang-rape in a Mercedes car

Gang Rape Case:  हैदराबादमध्ये  एका पबमध्ये पार्टीसाठी गेलेल्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर गेल्या शनिवारी मर्सिडिज कारमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सामूहिक बलात्कार (Gang Rape) केल्याचे धक्कादायक प्रकार घडला. यामध्ये एक आरोपी अल्पवयीन आहेत. एका आमदाराचा मुलगाही प्रकारात सामील असल्याचे बोललं जात आहे

एक 17 वर्षांची मुलगी तिच्या मैत्रिणीसोबत पबमध्ये आली होती, ती लवकर निघून गेली. पीडित मुलीची कथितपणे त्या मुलांशी मैत्री होती आणि ती तो मुलगा आणि मुलाच्या मित्रांसोबत पबमध्ये होती. त्यांनी मुलीला घरी सोडण्याचे आश्वासन दिले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही भयंकर घटना होण्यापूर्वी हा गट एका पेस्ट्री शॉपमध्ये गेला होता.

घरी सोडण्याच्या बहाण्याने जुबली हिल्स परिसरात त्या पाच मुलांनी कार उभी करून अल्पवयीन मुलीवर आळीपाळीने बलात्कार केला. आमदाराचा मुलगा, ज्याचे नाव या प्रकरणात समोर आले आहे, तो कथितरित्या मारहाण होण्यापूर्वी कारमधून खाली उतरला आणि पळून गेला.

जेव्हा मुलीच्या कुटुंबीयांनी तिच्या मानेवर झालेल्या जखमा पाहिल्या आणि तिला विचारले तेव्हा तिने सांगितले की, पबमध्ये एका पार्टीत गेल्यानंतर काही मुलांनी तिच्यावर हल्ला केला होता. मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी सुरुवातीला गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर तिने सविस्तर माहिती दिली असता बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला.

ही घटना शनिवारी घडल्याचं समोर येत आहे. प्राथमिक माहितीनंतर पोलिसांनी तीन जणांविरुद्ध भांदवि कलम 376, 354, 323, 09, 10, आणि पॉक्सो कायदा 2012 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. 17 वर्षीय पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे.

Web Title: 17-year-old girl who went to a party in a pub was gang-rape in a Mercedes car

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here