लग्न समारंभात जेवणानंतर तीन गावांतील ३३६ ग्रामस्थांना विषबाधा
लातूर | Latur: निलंगा तालुक्यातील मौजे केदारपूर या गावात २२ मे रोजी लग्न समारंभात (wedding ceremony) जेवण केल्यानंतर ग्रामस्थांना विषबाधा झाली. यामध्ये केदारपूर १७८, काटे जवळगा २५ व मौजे जवळगा १३३ अशा तीनही गावांत एकूण ३३६ रुग्णांवर उपचार करण्यात आले.
या लग्नासाठी मौजे जवळगा ता. देवणी येथील वऱ्हाडी मंडळी आली होती. ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, साधारण १ हजार लोकांचा स्वयंपाक तयार करण्यात आला. २२ मे रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास लग्न लागल्यानंतर लोकांनी जेवण केले. लग्नात जेवण केल्यानंतर रात्री केदारपूर येथील लोकांना मळमळ, उलटी, जुलाब, पोट दुखीचा त्रास जाणवू लागला. ७३ लोकांना प्राथमिक आरोग्य केंद्र अंबुलगा येथे उपचारासाठी दाखल केल्यानंतर संबधित वैद्यकीय अधिकारी गावात पथक घेऊन दाखल झाले.
Web Title: Poisoning of 336 villagers in three villages after meal at wedding ceremony