Home अकोले अकोले: शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

अकोले: शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

अकोले: शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

अकोले: अकोले तालुक्यातील समशेरपूर येथील मारुती भगवान राउत वय ५५ या शेतकर्याने सायंकाळी पाच वाजता राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

आत्महत्या करण्यामागचे नेमके कारण समजू शकले नाही मात्र त्याने काढलेले वित्तीय संस्थांचे कर्ज परतफेड न झाल्याने आत्महत्या केल्याची गावात चर्चा होत आहे.

दरम्यान घटनेची माहिती कळताच अकोले पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. मयत मारुती राउत यांचा मुलगा राहुल याने अकोले पोलीस ठाण्यात खबर दिली. त्यानुसार पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास पोलीस नाईक गोरने करत आहे.

दरम्यान अकोल्याचे तहसीलदार मुकेश कांबळे यांनी तसा अहवाल नगर जिल्हाधीकार्यांना कळविला आहे. मात्र त्यात भूमिहीन असल्याचे म्हंटले असून कर्जाबाबत उल्लेख नाही. भीषण दुष्काळात शेतकर्याने आत्महत्या केल्याने आढळा परिसरात खळबळ उडाली आहे.

वाचा लेख – प्रेमाला अंत नाही, वर्षभर (रोजच) व्हेलेंटाईन. संपादकीय: अजित गुंजाळ 

Website Title: Akole news Farmer suicide taking leprosy


संपूर्ण बातम्यासाठी पहा: संगमनेर न्यूज व अकोले न्यूज 


आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज, संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजच संपर्क करा. 9850540436


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here