खिरविरेत पेसाअंतर्गत मंजुर कामांचे उद्घाटन. बावीस लाख एक्यान्नव हजार रु. चा निधी मंजुर.
खिरविरेत पेसाअंतर्गत मंजुर कामांचे उद्घाटन. बावीस लाख एक्यान्नव हजार रु. चा निधी मंजुर.
पिंपळगाव नाकविंदा / प्रतिनिधी -विकासाची गंगा गावोगावी याप्रमाणे अकोले तालुक्यातील खिरविरे येथे १४वा वित्त आयोग व पेसा योजनेअंतर्गत मंजुर कामांचे उद्घाटन ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी तसेच ग्रामस्थ यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाले.
या कामांसाठी एकूण बावीस लाख एक्यान्नव हजार सातशे एकोनआंशी रुपये मंजुर झाले असुन या मंजुर कामांचा उद्घाटन सोहळा नुकताच संपन्न झाला.
यामध्ये गवळीबाबावाडी वाडया वस्त्यांना वितरन व्यवस्था करणे, गावठाण येथे पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन दुरुस्त करणे, आंबेविहीर तसेच धारवाडी येथे पाईपलाईन दुरूस्ती करणे, मानमोडी येथे शाळा दुरुस्ती करणे, चोमदेववाडी येथे जिल्हा परिषद शाळा रस्ता काँक्रेटीकरण करणे, कारवाडी येथे अंगणवाडी दुरुस्त करणे, गावठाण येथे शाळा संरक्षण भिंत बांधणे, गावठानाअंतर्गत बंधिस्त गटारी तसेच स्मशानभुमी अशा कामांचे उद्घाटन करण्यात आले.
याप्रसंगी खिरविरे ग्रामपंचायतीच्या सरपंच गिताबाई रावते, उपसरपंच सुनंदा आवारी, ग्रामसेवक किसन आवारी, ग्रामपंचायत सदस्य पंढरीनाथ शांताराम बेणके, त्रिंबक शंकर पराड, ज्ञानेश्वर डगळे, एकनाथ डगळे, भरत मेंगाळ, हिराबाई डगळे, कांताबाई बेणके, लिलाबाई बेणके, ज्योती डगळे, यांसह माजी सरपंच गणपत डगळे, माजी उपसरपंच देवराम हाळकुंडे आमृतसागर दुध संघाचे संचालक सुभाष बेणके, विजय आवारी, हरीभाऊ बेणके, काळु बेणके, अर्जुन पराड, पांडूरंग पराड, तुकाराम बेणके, संतोष बेणके, माधव आवारी, रामजी रावते, कोंडाजी रावते,राजु सगर यांसह ग्रामपंचायत कर्मचारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सर्व कामांना मंजुरी मिळवल्याबद्दल खिरविरे ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीचे विशेष आभार व्यक्त केले.
Website Title: Khirvire Inauguration of sanctioned works under Pesa
संगमनेर न्यूज | Sangamner News | वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा. संगमनेर अकोले बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आमच्या फेसबुक पेजला लाईक करा. Facebook Page.
आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज, संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजच संपर्क करा. 9850540436. त्यासाठी येथे क्लिक करा
Get Latest Marathi News, Marathi Batmya Today Live & Marathi News Live from Politics, Sports, Entertainment News, Sangamner Taluka News, Akole Taluka News, Marathi Batmya Live and मराठी बातम्या लाइव from all cities of Maharashtra.