तुझा नवरा तुला नांदवीत नाही, तू माझ्याकडे रहा म्हणत विवाहितेचा विनयभंग
Ahmednagar | राहुरी | Rahuri: तुला तुझा नवरा नांदवीत नाही, तू माझ्याकडे रहा. मी तुला सांभाळतो. असे म्हणून विवाहित तरुणीला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून विनयभंग (Molested) केल्याची घटना राहुरी तालुक्यातील बारागांव नांदूर येथे घडली आहे.
राहुरी तालुक्यातील बारागांव नांदूर परिसरात एक 26 वर्षीय विवाहित तरूणी तिच्या सासरच्या नातेवाईकांसह राहत आहे. दि. 29 एप्रिल रोजी साडे अकरा वाजे दरम्यान आरोपी लतिफ गुलाब शेख हा त्या विवाहित तरूणीला म्हणाला, तुझा नवरा तुला नांदवीत नाही. तू माझ्याकडे घरी रहा. मी तुला सांभाळतो. असे म्हणून त्याने विवाहित तरुणीच्या अंगाला नको त्या ठिकाणी हात लावून तिला लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. विवाहित तरूणीने विरोध केला असता लतिफ शेख म्हणाला, तू कोणाला काहीएक सांगू नको. तू जर कोणाला काही सांगितले तर तुला घरातच जिवंत गाडून टाकीन. अशी धमकी (Threat) दिली. असे फिर्यादीत म्हटले आहे.
विवाहित तरूणीने घडलेला सदर प्रकार तिच्या माहेरच्या लोकांना सांगितला. त्यांनी ताबडतोब राहुरी पोलिस ठाणे गाठून रितसर फिर्याद नोंदवली. विवाहित तरूणीच्या फिर्यादीवरून पोलिसांत आरोपी लतिफ गुलाब शेख, राहणार बारागाव नांदूर, ता. राहुरी. याच्या विरोधात विनयभंग व धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार हनुमंतराव आव्हाड करीत आहेत.
Web Title: You say stay with molested woman