सेल्फीच्या मोहामुळे तरुणाने जीव गमावला
अकोला | Akola: खदानमध्ये असलेले पाणी पाहून सेल्फी काढण्याचा मोह जीवावर बेतला आहे. मोहापायी जीव (Life) गमावल्याची घटना अकोल्यातील नशिवणी रेल्वेस्टेशन नजिकच्या कोठारी खदानमध्ये घडली आहे.
अकोल्यातील हर्ष बोचरे (वय २०) असे बुडालेल्या तरुणाचे नाव आहे. शोध कार्य करत असलेल्या पथकाला रात्री माहिती मिळाली होती. यावरून पथकाने रेस्क्यु बोटद्वारे सर्च ऑपरेशन चालु केले. यावेळी खदानीत कुठे 15 फुट , कुठ 25 ते 30 फुट खोल पाणी व कपारी होत्या. त्यात अंधार असल्याने सर्च ऑपरेशनला अडथळे निर्माण होत होते.
संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाने अथक प्रयत्नानंतर खदानमधून युवकाचा मृतदेह शोधून बाहेर काढला. शेवटी पाच तासानंतर युवकाचा मृतदेह रेस्क्यु टीमने शोधुन बाहेर काढला. खदान परिसराला पाहून सेल्फी काढण्याच्या मोहापायी जीव गमावल्याची माहिती आहे. मृतदेह शोधण्यासाठी पथक प्रमुख दीपक सदाफळे यांच्या पथकाने मेहनत घेतली.
Web Title: young man lost his life due to the temptation of selfie