Home अहमदनगर Ransom: फोटो व्हायरल करण्याची धमकी देत युवतीकडे खंडणीची मागणी

Ransom: फोटो व्हायरल करण्याची धमकी देत युवतीकडे खंडणीची मागणी

Demand ransom from young woman threatening to make the photo viral

अहमदनगर | Ahmednagar: मोबाईलमध्ये काढलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी देत युवतीकडे तीन लाख रूपयांची खंडणी (ransom ) मागितल्याचा प्रकार भिंगार कॅम्प पोलीस ठाणे हद्दीत घडला आहे. या प्रकरणी पीडित तरुणीने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तिच्या  फिर्यादीवरून दोघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली विधाटे (मुळ रा. नांदुर ता. आष्टी जि. बीड) व रोहिणी रावसाहेब गवळी (रा. कापुरवाडी ता. नगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. हि घटना 21 डिसेंबर, 2021 घडली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

आरोपींनी फिर्यादीच्या मोबाईलवर फोन केला व म्हणाले,‘तुझ्या सोबत काढलेले फोटो व्हायरल करू, फोटो व्हायरल करायचे नसल्यास तीन लाख रूपये द्यावे लागतील’, असे म्हणत खंडणीची मागणी केली. फिर्यादी यांनी पैसे देण्यास नकार देत आरोपींचे मोबाईल नंबर ब्लॉक केली.

आरोपींनी फिर्यादीच्या होणार्‍या पतीसह मित्राच्या मोबाईलवर फोटो टाकून बदनामी करत धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस नाईक बी. पी. गायकवाड करीत आहेत.

Web Title: Demand ransom from young woman threatening to make the photo viral

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here