Rape: धक्कादायक; ज्युनिअर अभिनेत्रीवर दिग्दर्शकाकडून बलात्कार
पुणे | Pune Crime: राज्यात महिला अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहे. अशातच पुण्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यात एका दिग्दर्शकाने ज्युनिअर अभिनेत्रीवर बलात्कार (Rape) केल्याची घटना घडल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबत पोलीस तपास करीत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पार्टीच्या बहाण्याने बोलावून ज्युनिअर अभिनेत्रीवर दिग्दर्शकाकडून बलात्कार (rape) करण्यात आला. सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे १७ वर्षांची असल्यापासून आजपर्यंत या दिग्दर्शकाने तिच्यावर लैंगिक अत्याचार (sexual abusing) केले आहेत, अशी तक्रार पीडित मुलीकडून करण्यात आली आहे.
अमित प्रेमचंद सिटलानी (वय ४०) असं या दिग्दर्शकाचं नाव आहे. त्याच्याविरोधात विश्रांतवाडी इथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमित सिटलानी हा सन फिल्म्सचा कास्टिंग डायरेक्टर आहे. काम मिळवून देण्याच्या बहाण्याने त्याने पीडितेवर वारंवार अत्याचार केले. इतकंच नाहीतर तर अत्याचाराचे व्हिडिओ शूट करून ते व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याचंही पीडितेने तक्रारीत म्हटलं आहे. याप्रकरणी पोलीस कसून अधिक चौकशी करत आहे.
Web Title: pune Crime Junior actress rape by director