संगमनेर: कमिशन न मिळाल्यामुळे सरपंचानी केली इंजिनियर व मजूरला मारहाण
Sangamner Crime | संगमनेर: संगमनेर तालुक्यातील वडगाव लांडगा येथे धक्कादायक घटना घडली आहे. कमिशन मिळाले नाही म्हणून गावातील सरपंचाने इंजिनियर व मजुरास मारहाण केली आहे. गुरुवारी सायंकाळी साडे पाच वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. गावात सुरु असलेल्या विकास कामात कमिशन मिळाले नाही म्हणून नाराज झालेल्या सरपंचाने हे संतापजनक कृत्य केल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, तालुक्यातील वडगाव लांडगा येथे ग्राम विकास निधी अंतर्गत सार्वजनिक शौचालय काम सुरु होते. हे काम एका शासकीय ठेकेदाराने घेतले आहे. गुरुवारी दुपारी काम सुरु असताना या कामावरील इंजिनियर सौरभ बाळासाहेब नवले व मजूर सचिन बाळासाहेब पगारे रा. टाकेद हे शौचालयाचे काम काम करीत असताना गावाचे सरपंच दत्तात्रय रामनाथ रोकडे हे तेथे आले आणि त्यांनी मजूर सचिन पगारे यांना दम देत तुला काम कोणी करायला सांगितले, तु काम कशाला करतोस असे म्हणत शिवीगाळ करून सचिन पगारे यास मारहाण केली. दगड घेऊन व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. हे पहात असताना इंजिनियर सौरभ नवले हे थांबविण्यासाठी मध्ये पडले असता सरपंचाने त्यानाही लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. याप्रकरणी सचिन पगारे यांनी फिर्याद दिल्याने संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात दत्तात्रय रामनाथ रोकडे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास तालुका पोलीस करीत आहे.
Web Title: Sangamner Crime Sarpanch beats engineer and laborer for not getting commission