रात्री सात ते आठ जणांनी टाकला दरोडा एकास तलवारीने भोकसले
रात्री सात ते आठ जणांनी टाकला दरोडा एकास तलवारीने भोकसले
शेवगाव: शेवगाव तालुक्यातील मुरमी या गावात रात्री दोनच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी दरोडा टाकला. मुरमी गावातील लहानू सिताराम गाडीवान याच्या घरी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास सात ते आठ जणांनी दरोडा टाकला. त्याच्यावर तलवारीने छातीवर वार केले. चार तोळे सोन्याचे दागिने, ४३ हजार रोख रक्कम, घरातील जमिनीचे महत्वाचे कागदपत्रे असलेली लोखंडी पेटी पळवून नेली. जवळचा असलेल्या शेतामध्ये लोखंडी पेटी फेकून देऊन त्यातला ऐवज घेऊन गेले.
You May Also Like: Bollywood Actresses Priyanka Chopra, Mallika successful adult Movie
गाडीवान घराच्या बाहेर झोपलेले होते. दोन वाजण्याच्या सुमारास सात ते आठ जणांनी त्याच्या घरात प्रवेश केला. तत्पूर्वी शाहादेव मोहन शिंदे यांच्या वस्तीवर चोरटे आले असता त्यांच्या घरातील लोक जागे झाले होते. परिसरातील सर्व वस्त्यांना फोन करून सांगितले गेले परंतु गाडीवान यांचा फोन बंद होता. चोरट्यांनी गाडीवान यांच्या घरावर हल्ला चढविला आणि गाडीवान यांना मारहाण केली. त्या चोरांनी घरातील चार जणांना जबर मारहाण केली. लहानू गाडीवान यांच्या छातीवर तलवारीने दोन तीन वार केले असल्याचे घरच्यांनी सांगितले. त्यानंतर रात्री शेवगाव पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली व रक्ताच्या थारोळ्यात असलेल्या लहानू गाडीवान यांना उपचारासाठी अहमदनगर येथे हलविण्यात आले.
Website Title: shevagaon news seven to eight people cracked
आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा. किवा आमचा नंबर 9850540436 सेव्ह करा आणि Add Me नावासह मेसेज करा. रहा अपडेट दररोज. बातमी आवडल्यास जरूर शेअर करा. धन्यवाद.
आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज , संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजच संपर्क करा. 9850540436
मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा
प्रमोटेड बातम्या: