संगमनेर: गुंजाळवाडी फाटा येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
संगमनेर: गुंजाळवाडी फाटा येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
संगमनेर: भरधाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने समोर समोरून जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकी स्वराचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात आज सकाळी १०:३० च्या सुमारास नाशिक पुणे महामार्गावर गुंजाळवाडी फाटा येथे झाला.
You May Also Like: Salman Khan upcoming movies 2018 and 2019
अमोल महेश कचरे असे या अपघातात ठार झालेल्या इसमाचे नाव आहे. याबाबत शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी कि मयत अमोल महेश कचरे हे आपल्या शाईन मोटार सायकल क्र. एम.एच. १७ सी.डी. ४८०९ वरून नाशिक पुणे महामार्गावरून जात असताना समोरून भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांना समोरून जोराची धडक दिली. या धडकेत कचरे यांच्या डोक्याला गंभीर मार लागून त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर वाहन चालक फरार झाला. या घटनेची खबर मिळताच शहर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघातानंतर दुपारपर्यंत शहर पोलीस ठाण्यात कोणताही गुन्हा दाखल झालेला नव्हता. केवळ पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास शहर पोलीस करत आहे.
आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा. किवा आमचा नंबर 9850540436 सेव्ह करा आणि Add Me नावासह मेसेज करा. रहा अपडेट दररोज. बातमी आवडल्यास जरूर शेअर करा. धन्यवाद.
आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज , संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजच संपर्क करा. 9850540436
मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा