Home महाराष्ट्र राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार लढविणार या तीन राज्यांच्या निवडणुका

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार लढविणार या तीन राज्यांच्या निवडणुका

NCP president Sharad Pawar will contest these three state elections

मुंबई: पाच राज्यातील विधानसभा निवडणुका (Election) निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आलेल्या आहेत.  यामधील ३  राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक लढणार आहे, अशी घोषणा राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad pawar) यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत केली.

मणिपूर विधानसभेत राष्ट्रवादीचे ४ आमदार होते. तिथे काँग्रेससोबत निवडणूक लढवण्याबाबत चर्चा झाली असून या निवडणुकीत तिथे ५ जागा लढविण्यात येणार असल्याची त्यांनी माहिती दिली. 

गोव्यात काँग्रेस, तृणमूल काँग्रेस यांच्यासोबत चर्चा सुरू आहे. जिथे आम्ही लढू इच्छितो त्याची यादी या दोन पक्षांना दिली आहे. तसेच, उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टीबरोबर निवडणूक लढवत आहोत, असेही त्यांनी सांगितले. 

उत्तर प्रदेशात काही जागा लढवण्याची चर्चा झाली आहे. उद्या तिथे समाजवादी पार्टीचा मेळावा आहे त्यात राष्ट्रवादी सहभागी होईल. त्यानंतर जागा वाटपावर चर्चा करण्यात येईल.  उत्तर प्रदेशात परिवर्तन अटळ आहे. तेथे लवकरच दौरा करणार असल्याचं त्यांनी सांगितले.

Web Title: NCP president Sharad Pawar will contest these three state elections

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here