तरुणीच्या घरात घुसून अंगाला हात लावत विनयभंग
राहुरी | Rahuri Crime News: तरूणीच्या घरात घुसून मोबाईल नंबर मागितला तसेच तिच्या अंगाला झटत जवळीक साधण्याचा प्रयत्न करून विनयभंग केल्याची घटना दिनांक २८ डिसेंबर रोजी घडली असून या प्रकरणी नितीन अडागळे याच्या विरोधात विनयभंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, २३ वर्षीय तरूणी ही दिनांक २८ डिसेंबर रोजी दुपारी चार वाजे सुमारास तिच्या घरातील झोपण्याच्या खोलीत होती. यावेळी आरोपी नितीन अडागळे हा अनाधिकृतपणे त्या तरूणीच्या घरात घुसला.
त्याने त्या तरूणीला मोबाईल नंबरची मागणी केली. तसेच तिच्या शरीराच्या वेगवेगळ्या अंगाला हात लावून जवळीक साधण्याचा प्रयत्न करून तिचा विनयभंग केला.
सदर तरूणीने तात्काळ राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी नितीन शहाजी अडागळे राहणार राहुरी खुर्द ता. राहुरी. याच्या विरोधात विनयभंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलिस निरीक्षक राजेंद्र इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार एकनाथ आव्हाड हे करीत आहेत.
Web Title: Rahuri Crime News Debauchery young woman’s house and touching her body