Home महाराष्ट्र Accident: स्कॉर्पिओने 2 सख्ख्या बहिणींना चिरडले तर दोन गंभीर जखमी

Accident: स्कॉर्पिओने 2 सख्ख्या बहिणींना चिरडले तर दोन गंभीर जखमी

Accident Scorpio crushed 2 sisters and seriously injured two

बीड | Accident: जामखेड – पाटोदा रस्त्यावर धनगर जवळका गावात धक्कादायक घटना घडली आहे. जेवण करून घराबाहेर उभे असलेल्या दोन सख्या बहिणींना भरधाव स्कॉर्पिओने चिरडल्याने दोघींचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. बीडच्या पाटोदा तालुक्यातील धनगर जवळका येथे रात्री 8 च्या सुमारास ही थरारजनक घटना घडली आहे. तर इतर दोघे गंभीर जखमी झाले आहेत, त्यांच्यावर पाटोदा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

रोहिणी महारुद्र गाडेकर आणि मोहिनी महारुद्र गाडेकर असे मयत बहिणींचे नावं आहेत. मयत मोहिनी ही डी फार्मसी चे शिक्षण घेत होती. तर स्कॉर्पिओने आणखीन दोघांना चिरडले असून ते गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेनंतर स्कॉर्पिओ चालक पसार झाला असून या प्रकरणी पाटोदा पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या घटनेने हळहळ व्यक्त केली जात असून गाडेकर परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Web Title: Accident Scorpio crushed 2 sisters and seriously injured two

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here