Accident: टेम्पो व दुचाकीच्या धडकेत १७ वर्षीय तरुण ठार
अहमदनगर | Accident: वेगाने येणारा टेम्पोने समोरून धडक दिल्यामुळे दुचाकीवरून जात असलेला १७ वर्षीय युवक ठार झाल्याची घटना घडली आहे.
ओम गंगाधर फलके रा. निमगाव वाघा ता. नगर असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे. २१ नोव्हेंबर रोजी सकाळी साडे सात वाजेच्या सुमारास नगर कल्याण रोडवर निमगाव फाट्याजवळ हा अपघात घडला. याप्रकरणी ओमचे वडील गंगाधर फलके यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी विकास जपे रा. खातगाव याच्या विरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. अधिक तपास नगर तालुका पोलीस करीत आहे.
Web Title: Accident 17-year-old killed in tempo-bike collision