संगमनेर शहरातील हॉटेलमधून रोकड व विदेशी दारू चोरीस
संगमनेर | Theft: संगमनेर शहरातील हॉटेल राज पॅलेस येथे सोमवारी रात्री चोरीची घटना घडली आहे. हॉटेलची खिडकी तोडून चोरट्यांनी आत प्रवेश करीत दीड लाख रुपयांची रोकड आणि ६० हजार रुपयांची विदेशी दारू असा एकूण २ लाख १० हजार रुपयांचा मुदेमाल चोरून नेण्यात आला आहे.
याप्रकरणी हॉटेल व्यवस्थापक भाग्येश नंदकिशोर ओझा रा. कॅप्टन लक्ष्मी चौक संगमनेर यांनी फिर्याद दिली असून या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक निकिता महाले करीत आहे. दरम्यान संगमनेर शहरात चोरीचे सत्र सुरूच आहे.
ब्रेकिंग: अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग अपडेट वाचण्यासाठी संगमनेर अकोले न्यूज नवीन सुपर फास्ट स्वरूपात आजच आपला अॅप येथून अपडेट करा. संगमनेर अकोले न्यूज
Web Title: Cash and foreign liquor theft from a hotel in Sangamner