संगमनेर: कारवरील ताबा सुटल्याने कार थेट संरक्षण लोखंडी कठडे तोडून खोल दरीत
संगमनेर | Accident: चालकाचा कारवरील नियंत्रण सुटल्याने कार थेट खोल दरीत कोसळल्याची घटना संगमनेर तालुक्यातील पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील चंदनापुरी घाटात घडली हा अपघात रविवार दिनांक २१ नोव्हेंबर रोजी दुपारी २:१५ वाजेच्या सुमारास घडला. या अपघातात चालक व त्याचा जोडीदार किरकोळ जखमी झाला आहे.
याबाबत डोळासणे महामार्ग पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सुनील गलांडे व त्याचा जोडीदार हे दोघे जण रविवारी दुपारी कार मधून संगमनेर येथून पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गाने घारगावच्या दिशेने जात असताना चंदनापुरी घाटातील वळणावर आले असता चालक सुनील यांचा कार वरील ताबा सुटल्याने कार थेट महामार्गाच्या कडेला असलेले संरक्षण लोखंडी कठडे तोडून खोल दरीत कोसळली आहे. या अपघातात दोघेही किरकोळ जखमी झाले आहे.
अपघात झाल्याची माहिती मिळताच डोळासणे महामार्ग पोलीस मदत केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक भालचंद्र शिंदे, सुनील साळवे, मनिष शिंदे, संजय मंडलिक, नंदकुमार बर्डै, भरत गांजवे, अरविंद गिरी यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी क्रेनला पाचारण करण्यात आले आणि खोल दरीतून कार बाहेर काढण्यात आली आहे. गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. महामार्गावरील अपघाताचे सत्र सुरूच आहे.
महत्वाचे: संगमनेर अकोले न्यूज नवीन सुपर फास्ट स्वरूपात आजच आपला अॅप येथून अपडेट करा. संगमनेर अकोले न्यूज
Web Title: Sangamner Accident car shields directly into the deep valley breaking