संगमनेर: चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने कारचा अपघात
संगमनेर | Accident: संगमनेर तालुक्यातील पुणे नाशिक महामार्गाच्या पोखरी शिवारात स्विफ्ट कार (एम.एच. ०२ ७४४१) चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने कारचा अपघात घडल्याची घटना आज शुक्रवारी दुपारी घडली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
गोपाल अंकुळनेकर वय ३३ रा. बोटा माळेवाडी असे या कार चालकाचे नाव आहे. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. कार पूर्णपणे पलटी झाली आहे. दगडांमुळे ही कार दरीत कोसळण्यापासून वाचली. यावेळी मोठा अनर्थ टळला. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची घटना समजताच महामार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
महत्वाचे: संगमनेर अकोले न्यूज नवीन सुपर फास्ट स्वरूपात आजच आपला अॅप येथून अपडेट करा. संगमनेर अकोले न्यूज
Web Title: Sangamner car accident in which the driver lost control of the car