संगमनेर शहरात बालदिनीच दोन चिमुकल्या मुलींची आई वडिलांपासून ताटातूट
संगमनेर | Sangamner: रविवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास जुन्या नाशिक पुणे महामार्गावर सहयाद्री शाळेपासून काही अंतरावर स्थानिकांना दोन लहान मुली रडताना दिसून आल्या. त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांना काहीही सांगता आले नाही.
दोन तीन वर्ष वयोगटातील या मुलीना त्यांची नावे, पत्ता, आई वडिलांचे नाव असे काहीही सांगता आले नाही. या दोन लहान मुलींची आई वडिलांपासून ताटातूट झाली असल्याची माहिती फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष कार्तिक जाधव याना मिळाली. त्यांनी बनभेरु व अभंग यांना माहिती कळविली. नगरसेवक अभंग आणि बनभेरु यांनी तत्काळ मुली सापडलेल्या ठिकाणी जाऊन विचारपूस केली. मुलीना बिस्किटे व फळे दिली. त्यांनी मुलीना संगमनेर शहर पोलीस ठाण्यात पोहोचविले. या मुलीना पोलिसांच्या ताब्यात दिले. या मुलींकडे राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभिनयाचे माता आणि बालक संरक्षण कार्ड मिळाले. त्यावर औरंगाबाद व नाशिक जिल्ह्यातील पत्ते आहेत. संगमनेर शहर पोलिसांनी नाशिक पोलिसांशी संपर्क केला आहे. सद्या या मुलींची जबाबदारी संगमनेरातील एका स्वयंसेवी संस्थेकडे देण्याबाबत पत्रव्यवहार सुरु असल्याचे सांगितले. या मुलींबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास संगमनेर शहर पोलीस ठाण्यात संपर्क करण्याचे आवाहन पोलीस यांनी केले आहे.
Web Ttile: Sangamner Divorce from parents of two Chimukalya girls