Home अकोले अकोले: राजूरला दोन गटांत हाणामारी – दोघांना अटक

अकोले: राजूरला दोन गटांत हाणामारी – दोघांना अटक

अकोले: राजूरला दोन गटांत हाणामारी – दोघांना अटक

अकोले तालुक्यातील राजूर गावात गणपती विसर्जन मिरवणुकीत दोन मंडळाच्या गटात वाद झाले. यावेळी पोलिसांवर दगडफेक झाल्याने स्ट्रायकिंग फोर्सेने जमावावर लाठीमार केला. या घटनेने राजूर गावात वातावरण तणापूर्ण बनले आहे. याप्रकरणी सहा जणांना राजूर पोलिसांनी अटक केली त्यांना न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

You May Also LikeJacqueline Fernandez bikini images and Jacqueline Fernandez sexy images

राजूरमधील गुरुदत्त मित्र मंडळ आणि छत्रपती तरुण मित्र मंडळ या दोन मंडळाच्या मिरवणुका नाट्य चौकात आल्या. यावेळी फटाके वाजाविन्यावरून दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांत बाचाबाची झाली. दोन्ही मंडळाच्या मिरवणूक बंद करण्यात आल्या. घटनास्थळी जमाव मोठ्या संख्येने जमला होता. पोलिसांनी जमावाला शांत राहण्याचे आवाहन केले,मात्र जमावातील काही तरुणांनी थेट पोलिसांवर दगडफेक केली. यामुळे संतप्त पोलीस प्रशासनाने जमावाला पांगविण्यासाठी लाठीमार केला. रात्री एक वाजविण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. या घटनेने संपूर्ण राजूर गावातील वातावरण दुषित झाले. घटनेची माहिती समजताच प्रांतधिकारी भागवत डोईफोडे,  पोलीस उपाधीक्षक अशोक थोरात, तहसीलदार मुकेश कांबळे, प्रमोद वाघ यांच्यासह शंभरहून अधिक स्ट्राय फोर्स राजुरात दाखल झाले. या बाचाबाचीत काही पोलिसांना धक्काबुकी झाली . दोन पोलीस जखमी असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली, मात्र या लाठीमारामुळे गणपती मंडळाचे कार्यकर्ते गावातून पसार झाले. रात्री उशिरा दीड वाजता राजूर पोलिसांनी गणपतीची आरती करून गणपती बाप्पांचे विसर्जन केले. या प्रकरणातील सहा आरोपींवर गुन्हा दाखल करून राजूर पोलिसांनी अटक केली. चार जणांना न्यायालयात हजर केले असता, त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. दंगलीच्या गुन्ह्यात आरोपी राजा हरिभाऊ कानकाटे, नंदू हरिभाऊ कानकाटे , विनायक उत्तम चोथवे, श्रीकांत अशोक कानकाटे, पंकज मुर्तडक, अक्षय राजू कानकाटे , यांना ताब्यात घेतले व इतर फरार राजू राधुजी भडांगे व मंडळाचे कार्यकर्ते, संतोष हरिभाऊ कानकाटे , जीवन चोथवे, सतीश अशोक कानकाटे , प्रशांत नंदू कानकाटे , सोमा मुतडक , किरण वराडे प्रीतम येलमामे मुयुर मुतडक या आरोपींच्या शोधात पोलीस आहेत. फिर्याद नितीन रावसाहेब सोनावणे यांनी दिली. पोलीसंवार झालेली दगडफेकीत हवालदार विनय किसन मंडलिक व दिलीप खंडू डगळे हे जखमी झाले आहेत. अधिक तपास उप निरीक्षक नितीन बेंद्रे हे करत आहेत.


आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.  किवा आमचा नंबर 9850540436 सेव्ह करा आणि Add Me नावासह मेसेज करा. रहा अपडेट दररोज. बातमी आवडल्यास जरूर शेअर करा. धन्यवाद.


आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज , संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजचा संपर्क करा. 9850540436


मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here