आम्हाला सर्वानांच निलंबित करा, जिल्हा रुग्णालयातील नर्सचे काम बंद आंदोलन
अहमदनगर | Ahmednagar: जिल्हा रुग्णालयात भाऊबीजेच्या दिवशी अतिदक्षता विभागाला आग लागून ११ जणांचा जीव गेला आहे. याप्रकरणी जिल्हा शल्यचिकित्सक आणि स्टाप नर्सेसना निलंबित करण्यात आले आहे. दोन नर्सेसची सेवा समाप्त करण्यात आला आहे. त्यामुळे नर्सेसमध्ये संताप उमटला आहे. आम्हाला सर्वांनाच निलंबित करा आमची काय चूक? अग्निशामक यंत्रणा बसविणे हे काय आमचे काम आहे का? असा सवाल त्यांनी केला आहे.
जिल्हा रुग्णालयातील सर्व नर्सेस काम सोडून बाहेर आहेत. आम्हाला आता निलंबित केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. आम्हाला निलंबित करा किंवा त्यांचे निलंबन मागे घ्या असा पवित्रा नर्सेसनी घेतला आहे. कोरोना काळात आम्ही आमचे जीव धोक्यात घालून काम केले. जिल्हा रुग्णालयात लागलेल्या आग अग्निशमन यंत्रणा नसल्याने लागली. अग्नीशमन यंत्रणा बसविणे हे काय आमचे काम नाही असे त्यांनी म्हंटले आहे.
Web Title: Ahmednagar Movement to stop work of nurses in district hospital