पोलिसांसमोरच तरुणास भोकसले, दोन गटांत राडा
सोनई | Ahmednagar: सोनई येथील बसस्थानक परिसरात वाहने पार्किंग करण्याच्या वादातून एका तरुणास पोलिसांसमोरच भोकसल्याने सोनईत दोन गटांत तुंबळ राडा झाला. ही घटना काल २५ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडल्याने दिवसभर तणावपूर्ण वातावरण होते. फारूक पठाण असे भोकसून जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. कायदा व सुव्यवस्था धोक्यात आल्याने पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आल्याने गावात जणू छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते.
दोन गटांत हाणामारी होऊन फारूक पठान या तरुण व्यावसायिकास भोकासले. गंभीर जखमी झाल्याने त्यास नगर येथे रुग्णालयात उपचारासाठी [पाठविण्यात आले. सोनईत पोलीस मोठ्या संखेने दाखल झाल्याने जणू छावणीचे स्वरूप आले. पोलीस उपविभागीय अधिकारी सुदर्शन मुंढे घटनास्थळी दाखल झाले होते,
दिनांक २५ रोजी सकाळी गाडी पार्किंग करण्याच्या कारणावरून वाद होऊन दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. या हाणामारीची खबर पोलिसांना देण्यात आल्याने पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांसमोरच हातातील धारदार शस्त्राने तरुणावर हल्ला करून भोकसले. या हल्ल्यात फारूक पठान हा जखमी झाला, याबाबत पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी मुस्लीम समाजाने निवेदनाद्वारे केली आहे.
Web Title: Ahmednagar young man was stabbed in front of the police