Murder: धक्कादायक घटना: मुलाकडूनच जन्मदात्या वडिलांचा खून
पारनेर | Murder Case: वडील नेहमीच दारू पिऊन आईला मारहाण करीत असे. हा रोजचा त्रास मुलाला सहन होत नव्हता. शुक्रवारी रात्री वडिलांनी आईला मारहाण करून कोंडून ठेवले. त्यामुळे चीड आलेल्या मुलाने वडिलांना लाकडी दांडक्याने मारहाण केल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची घटना पारनेर तालुक्यातील वासुंदे गावात ही घटना घडली आहे. पोलीस घटनास्थळी दाखल होताच आईलाच मुलाविरुद्ध फिर्याद दिली. पोलिसांनी मुलास अटक केली आहे.
बाळासाहेब बारकू झावरे वय ५० असे मृत्यू झालेल्या वडिलांचे नाव आहे. पत्नी मंदा बाळासाहेब झावरे यांना नेहमी मारहाण करीत असे. त्यांचा मुलगा राहुल बाळासाहेब झावरे यास हे सहन होत नव्हते. अनेकदा समजावून देखील आईला मारहाण करण्याचा प्रकार बंद झाला नाही. शुक्रवारी रात्री पुन्हा आईला मारहाण केल्याचा प्रकार घडला. दारूचे व्यसन असल्यामुळे घरात नेहमी भांडणे होत. आईला खोलीत कोंडले. याचाच मुलाला राग आल्याने त्याने लाकडी दांडक्याने आपल्या वडिलांना मारहाण केली. तोंडावर डोक्यावर फटके बसल्यामुळे ते बेशुद्ध झाले. उपचारासाठी टाकळी ढोकेश्वर येथे रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मायात घोषित केले.
या घटनेची माहिती मिळताच पारनेरचे पोलीस निरीक्षक घन:श्याम बळप यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेची चौकशी केली. राहुलची आई मंदा यांनी पोलिसांनी घटनेची माहिती आणि नंतर कायदेशीर फिर्यादही दिली. त्यानुसार पोलिसांनी मुलगा राहुल याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहे.
Web Title: Parner Murder of the father who gave birth to the child