संगमनेरातील प्रकार बँकेत कर्ज मंजूर करताना ५६ लाखांचा अपहार
संगमनेर | Crime News: बँकेच्या व्यचस्थापकासह इतर दोघांनी बनावट कागदपत्र तयार करून बँकेत कर्ज प्रकाराने मंजूर करताना ५६ लाखांचा अपहार करणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिनांक १ जानेवारी २०११ ते ३१ डिसेंबर २०१३ या कालावधीत युनियन बँक ऑफ इंडियाच्या संगमनेर शाखेत हा अपहार झाला आहे. सर्व आरोपी फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
नितीन कुमार (शाखा व्यवस्थापक), रुपेश आर धारवड (सिंगल विंडो ऑपरेटर), विलास एल. कुटे (मध्यस्थी, सुकेवाडी ता. संगमनेर) या तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
समाधान सीताराम पवार शाखा व्यवस्थापक युनियन बँक संगमनेर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नितीन कुमार हा बँकेत शाखा व्यवस्थापक असताना त्या काळात रुपेश हा बँकेत सिंगल विंडो ऑपरेटर म्हणून काम करीत होता. तर कुटे कर्ज प्रकरणात मध्यस्थी होता. या कालावधीत कर्ज प्रकरणे मंजूर करून अदा करणे यांनी संगनमत करून हा प्रकार केला. त्यांनी आर्थिक लाभ व स्वार्थासाठी बेकायदेशीरपणे गैरमार्गाचा अवलं केला. नियमाप्रमाणे कर्जदाराकडून आवश्यक कागदपाते ना घेता कर्ज अदा केले. तसेच कर्जदाराच्या सह्यांमध्ये तफावत आढळून आली. या तिघांनी खोटे व बनावट कागदपत्रे तयार करून खरे असल्याचे भासवत बँकेत सादर करत कर्ज मंजूर केले असेही फिर्यादीत म्हंटले आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख अधिक तपास करीत आहे.
Web Title: Crime News Embezzlement of Rs 56 lakh while sanctioning loan in the bank