संगमनेर: वाहन चोरटयांची टोळी शहर पोलिसांकडुन जेरबंद- ट्रक, पिकअपसह २५ मोटारसायकल हस्तगत
वाहन चोरटयांची टोळी शहर पोलिसांकडुन जेरबंद- ट्रक, पिकअपसह २५ मोटारसायकल हस्तगत
संगमनेर: – संगमनेर शहर व परिसरात गेल्या काही दिवसांपासुन वाहन चोरटयांनी उच्छांद मांडला होता. वेगवेगळया ठिकाणावरुन अनेक वाहन चोरुन नेलेली होती. या वाहन चोरटयाविरुध अखेर मोहिम उघडत वाहन चोरांची मोठी टोळी जेरबंद करत त्यांच्याकडुन एक १० चाकी ट्रक, एक महिंद्रा पिकअपसहीत सुमारे २५ मोटारसायकल असा एकुण सुमारे २० लाखांचा मुद्येमाल जप्त करीत तिघांना अटक केली.
You May Also Like: Salman Khan upcoming movies 2018 and 2019
वाढत्या वाहन चोरीच्या विरोध्दांत जिल्हा पोलिस अधिक्षक रजनकुमार शर्मा, अप्पर पोलिसि अधिक्षक रोहिदास पवार, उपविभागीय पोलिस अधिकारी अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिस निरीक्षक अभय परमार व पोलिस उपनिरिक्षक पंकज निकम यांच्या नेतृत्वाखाली पो. हे. कॉ. विजय खंडीझोड, रमेश लबडे, ए.के, आरवाडे, विजय पवार, राजेंद्र घोलप, सागर धुमाळ , सुभाष वोडखे, अमृत आढाव, व त्यांच्या सहकाऱ्यांनी विविध ठिकाणी छापेमारी करत या चोऱ्यांच्या छडा लावला. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी सागर गुरुमुखदास जीवनाणी उर्फ सनी आहुजाप (वय,२४ )हल्ली रा. मुसळगाव , ता .सिन्नर , जि.नाशिक, मुळगाव श्रीरामपुर यांच्याकडुन सुमारे २५ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या. या चोरी प्रकरणी त्याला अटक करण्यात आली. असुन न्यायालयाने त्याला १८ सप्टेंबर पर्यंत न्यायालयीन कोठडी ठोठावली आहे.
शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजि नं.२९०/२०१८ नुसार दाखल असलेल्या गुन्ह्याचा तपास करतांना पो.ना.आर.एम.सानप यांनी एका महिंद्रा कंपनीचा मालवाहु पिकअप व होंडा कंपनीची युनीकॉन मोटार सायकल आरोपी अलताप युसुफ शेख (वय २१ ) रा. धावडे वस्ती भोसरी , पुणे , हल्ली रा. कुरण, ता. संगमनेर याच्याकडुन हस्तगत करत त्याला अटक करण्यात आली. त्याच बरोबर शबर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा रजि नं १८५/२०१८ , कलम ३८९प्रमाणे दाखल असलेल्या गुन्ह्यात सहाय्यक फौजदार यांनी एक होंडा कंपनीची पिवळसर रंगाची डिओ मेापेड मोटार सायकल नंबर एम.एच.१७ बी.डब्ल्यु ४२२९ ही आरोपी सचिन लक्ष्मण गोसावी, रा. सुकेवाडी यांच्या कडुन हस्तगत करण्यात आली.
गुन्हा रजि. नं. २८७ /२०१८ , कलम ३७९ प्रमाणे दाखल असलेल्या गुन्ह्यात पोलिस हेड कॉ. डी.व्ही. पवार यांनी एका टाटा कंपनीची १० चाकी ट्रक आरोपीकडुन हस्तगत केली. शहर पोलिसांनी ही धडक व मोठी कारवाई केली असुन सुमारे २० लाखांचा मुद्देमाल जप्त करत आरोपीनां अटक केली आहे. शहर पोलिस स्टेशन हद्दीत किंवा इतरही ठिकाणी आपली वाहने चेारीला गेली असल्यास वाहन धाराकांनी आपल्या वाहनांची ओळख पटवुन ही वहाने ताब्यात घ्यावी असे अवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात, पोलिस निरीक्षक अभय परमार यांनी केली आहे. पोलिसांनी केलेल्या या कारवाईचे विविध स्तरातुन अभिनंदन होत असुन मोठया कालावधीनंतर पोलिसांनी हे मोठे यश प्राप्त झाले आहे. या वाहन चोरटयांकडुन मोठया प्रमाणावर वहाने हस्तगत झाले असुन आणखीही वहाने त्यांच्याकडे असण्याची शक्यता असुन पोलिस पुढील तपास करत आहे.
आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा. किवा आमचा नंबर 9850540436 सेव्ह करा आणि Add Me नावासह मेसेज करा. रहा अपडेट दररोज. बातमी आवडल्यास जरूर शेअर करा. धन्यवाद.
आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज , संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजचा संपर्क करा. 9850540436
मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा
Marathi Batmya Today Live