सहायक पोलीस निरीक्षकास मारहाण, २५ जणांवर गुन्हा दाखल
जामखेड | Crime News: तालुक्यातील अरणगाव परिसरात गावरान कोंबडी खरेदीसाठी आलेल्या सहायक पोलीस निरीक्षकासह इतर चौघांना ग्रामस्थांनी बेदम मारहाण करण्यात आली. सरपंच आल्याने मोठा अनर्थ टळला. शुक्रवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. जामखेड पोलीस ठाण्यात शुक्रवारीच २५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बुलढाणा नियंत्रण कक्षात कार्यरत असलेले सहायक पोलीस निरीक्षक किरण कांबळे, संजय विठ्ठल निकाळजे, विशाल भानुदास कांबळे सर्व रा. ता. आष्टी जि. बीड असे मारहाण झालेल्यांची नावे आहेत.
येथे पहा: हार्दिक पांड्याची बॅटिंग १ ओव्हर ६ ६ ६ ६ ४ १, हेलिकॉप्टर शॉट
आष्टी तालुक्यातील पांडेगव्हाण येथील वस्तीवर गावरान कोंबडी पालनाचा व्यवसाय आहे. शुक्रवारी सायंकाळी एका कारमधून सहायक पोलीस निरीक्षक किरण कांबळे व इतर जण ग्रामीण भागात गावरान कोंबडी खरेदीसाठी गेले होते. कोंबड्या न मिळाल्याने ते अरणगाव बसस्थानक परिसरात आले. तेथे दुचाकीहून आलेल्या दोघांनी त्यांच्या कारला दुचाकी आडवी लावली. शिवीगाळ करून चौघांना कारमधून उतरविण्यासाठी धमकाविले. यावेळी बाळासाहेब मिसाल, डॉ. सुरज जायभाय, राजू तुकाराम जायभाय रामकिसन जायभाय व इतर २० ते २५ जणांनी कारवर दगड मारून काचा फोडल्या. कारचा दरवाजा उघडून लोखंडी रॉड, बांबू, दगड. काठीने मारहाण केली. खिशातील ५० हजार रुपये हिसकून घेत जबर मारहाण केली. किरण कांबळे सहायक पोलीस निरीक्षक आहे असे सांगितले तरीही त्यांना मारहाण केली. त्याचवेळी अरणगावचे सरपंच अंकुश शिंदे आले व त्यांनी सोडविले.
Web Title: Crime News Assistant Police Inspector beaten