Home क्राईम संगमनेर पोलिसांचा कत्तलखान्यावर छापा, २२ जनावरांची सुटका

संगमनेर पोलिसांचा कत्तलखान्यावर छापा, २२ जनावरांची सुटका

Sangamner police raid the slaughterhouse Crime Filed

संगमनेर | Crime: संगमनेर शहरातील जमजम कॉलनी येथील कत्तलखान्यावर शहर पोलिसांनी छापा टाकत कत्तलीसाठी बांधून ठेवलेल्या २२ जनावरांची सुटका करण्यात आली आहे. याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी पसार झाला आहे.

शहर पोलिसांना शहरातील जमजम कॉलनी परिसरात कत्तलीसाठी जनावरे बांधून ठेवल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी शनिवारी सायंकाळी जमजम कॉलनी परिसरात अब्दुल वाहिद करीम कुरेशी यांच्या वाड्यावर छापा टाकला. यावेळी २२ गोवंश जातीचे जनावरे कत्तलीसाठी बांधून ठेवल्याचे पोलिसांना आढळून आले. पोलिसांनी पंचनामा करून जनावरांची सुटका केली. सुमारे ४ लाख ७ हजार रुपयांची जनावरे पोलिसांनी ताब्यात घेतली. पोलिसांची चाहूल लागताच आरोपी पसार झाला आहे. याबाबत शहर पोलीस ठाण्यात पोलीस कॉन्स्टेबल अविनाश बर्डे यांनी फिर्याद दिली आहे, यावरून अब्दुल वाहिद करीम कुरेशी (रा. जमजम कॉलनी, संगमनेर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक पुढील तपास पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक आशिष आरवडे करीत आहे.

WebSite: Sangamner police raid the slaughterhouse Crime Filed

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here