Home अहमदनगर पेट्रोल पंपावर बाटलीत पेट्रोल न दिल्याने चौघांनी केली कर्मचाऱ्याला मारहाण

पेट्रोल पंपावर बाटलीत पेट्रोल न दिल्याने चौघांनी केली कर्मचाऱ्याला मारहाण

four persons beat up an employee for not giving petrol crime filed

शिर्डी | Crime: कोरोना पार्शभूमीवर जिल्ह्यात अनेक निर्बंध लागू आहेत. यामध्ये फक्त अत्यावश्यक सेवांना मंजुरी आहे. पेट्रोलसाठी ठराविक वेळ ठरवून देण्यात आली आहे.

सकाळी ११ नंतर अत्यावश्यक सेवा वगळता पेट्रोल मिळत नाही. मात्र वेळेच्या नंतर पेट्रोलची मागणी केल्याने कर्मचाऱ्याने पेट्रोल देण्यास नकार दिला असता याचाच राग येऊन पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याला चौघांनी जबर मारहाण केली. याबाबत शिर्डी पोलीस ठाण्यात चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सावळीविहीर येथील गणेश गोविंद भवर वय २१ हा पेट्रोल पंपावर काम करीत असताना तेथे संदीप रमेश विघे, सचिन रमेश विघे. विशाल अशोक आगलावे, प्रशांत पालकर सर्व रा. सावळीविहीर हे तेथे आले आणि आम्हाला बाटलीमध्ये पेट्रोल असे म्हणू लागले. त्यावर बाटलीमध्ये पेट्रोल देण्यास मालकाने मनाई केली आहे असे त्या चौघांना सांगितले. याचा राग येऊन त्यांनी हातातील लाकडी दांड्याने व लोखंडी रॉडने भवर याच्या हातावर, पायावर मारहाण केली. याप्रकरणी गणेश भवर यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

Web Title: four persons beat up an employee for not giving petrol crime filed

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here