Breaking News Rajiv Satav: खासदार राजीव सातव यांचे निधन
Breaking News Rajiv Satav: कॉंग्रेसचे खासदार राजीव सातव यांचे निधन झाले आहे. पुणे येथील जहागीर रुग्णालयात अखेरचा श्वास त्यानी घेतला. शुक्रवारी रात्री त्यांची प्रकृती खालाविल्याने डॉक्टरांनी उपचार सुरु करूनही शनिवारी दिवसभरात सुधारणा होत असल्याचे सांगण्यात आले मात्र कोरोनानंतर आजाराशी त्यांची झुंज अपयशी ठरली.
त्यांनी कोरोनावर मात देखील केली होती पण सातव यांना नव्या विषाणूची लागण झाल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. मागील १५ दिवसांपासून त्यांच्यावर जहागीर रुग्णालयात उपचार सुरु होते. शुक्रवारी अचानक तब्येत बिघडली आणि रविवारी त्यांचे निधन झाले. कॉंग्रेस प्रवक्ता रणदीपसिंह सुरजेवाला यांनी निधनाचे वृत्त दिले आहे.
निशब्द !
आज एक ऐसा साथी खो दिया जिसने सार्वजनिक जीवन का पहला कदम युवा कांग्रेस में मेरे साथ रखा और आज तक साथ चले पर आज…
राजीव सातव की सादगी, बेबाक़ मुस्कराहट, ज़मीनी जुड़ाव, नेत्रत्व और पार्टी से निष्ठा और दोस्ती सदा याद आयेंगी।
अलविदा मेरे दोस्त !
जहाँ रहो, चमकते रहो !!!
Web Title: Rajiv Satav Passes Away