राज्यात १८ ते ४४ वयोगटातील लसीकरणास स्थगिती तर लॉकडाऊन वाढविण्यावर एकमत
Maharashtra Lockdown: आज कॅबिनेट बैठक पार पडली यामध्ये दोन महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहे. याबाबत आरोग्यमंत्री यांनी हे निर्णय जाहीर केले आहे.
कॅबिनेटच्या बैठकीत १८ ते ४४ वर्षावरील वयोगटातील लोकांच्या लसीकरणाला तूर्तास स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लसींच्या तुटवड्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या ४५ वर्षावरील लोकांचे दुसरा डोस देणे महत्वाचे असल्यामुळे खरेदी केलेल्या लसींचा वापर दुसऱ्या डोससाठी वापरण्यात येणार आहे. जर दुसरा डोस घेतला नाही तर दुसऱ्या डोसचा काहीही उपयोग होणार नाही. त्यामुळे सर्वात अगोदर ४५ वर्षावरील लोकांचे लसीकरण पूर्ण करणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे १८ वर्षावरील नागरिकांनी पहिल्या डोसची अपेक्षा करू नये. लसींच्या उपलब्धतेनुसार पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगितले.
ब्रेक द चैन या मोहिमेअंतर्गत कडक निर्बध वाढविण्याकडे मंत्रिमंडळाचा कल आहे. त्याबाबत आज चर्चा झाली. यावर अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेणार असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. राज्यात ३१ मे पर्यंत निर्बध वाढविण्याची मागणी बैठकीत झाली. १५ मे रोजी ब्रेक द चैन अंतर्गत असलेली कडक निर्बंधचा कालावधी संपत आहे. त्यामुळे यावर चर्चा झाली असून सर्वांचे एकमत झाले असून अंतिम निर्णय मुख्यमंत्री जाहीर करणार असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
Web Title: Consensus on increasing Maharashtra lockdown