शिर्डीत चिमुकलीला सोडून आई गेली निघुन
शिर्डी साई दर्शनाच्या निमित्ताने आलेल्या नाशिक येथील एक महीला आपल्या पाच वर्षाच्या चिमुकलीला गुरुवारी (दि.23) दुपारी बारा वाजेच्या सुमारास नगरपंचायतीजवळ सोडून निघुन गेली. यासंदर्भात चिमुकलीने सांगितलेल्या वर्णनावरुन पोलिसांनी तिच्या आईचा शोध घेतला. मात्र शोध लागला नाही. सदर चिमुकलीची रवानगी नगारच्या बालसुधारगृहात करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
You May Also Like: Deepika Padukone Ranveer Singh Marriage Date
याबाबत अधिक माहीती अशी : शुभा प्रसाद शर्मा (रा. पाथर्डी फाटा, नाशिक) असा पत्ता सांगणारी पाच वर्षाची चिमुकली नगरपंचायतसमोर रडत उभी होती. यावेळी लोकांनी तिची विचारपुस केली असता तिची आई सोनी हिने साई दर्शनासाठी येथे सोडून निघुन गेल्याचे रडत रडत सांगितले. तसेच वडिलांचे निधन झालेले असून अथर्व नावाचा लहान भाऊ असल्याचे सांगितले. नागरिकांनी तत्काळ याबाबत माहिती दिल्यानंतर पोलिसांनी चिमुकलीला ताब्यात घेऊन विचारपुस केली. त्यानंतर पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या पथकाने सायंकाळपर्यंत तिच्या आईच्या शोध घेतला. मात्र, ती मिळुन आली नाही. त्यामुळे शुभाला नगरच्या बाल सुधारगृहात दाखल करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. चिमुकलीला आईने शिर्डीत का सोडुन दिले असा प्रश्न आता आपल्या समोर नक्कीच येथे असेल.
मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा
आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद. मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा. आपल्याला ही बातमी आवडल्यास फेसबुक वर जरूर शेअर करा धन्यवाद.