Home क्राईम सुनेस सासरा व नणंदकडून बेदम मारहाण, गुन्हा दाखल

सुनेस सासरा व नणंदकडून बेदम मारहाण, गुन्हा दाखल

Shirdi beating by Sunes's father-in-law and Nand

शिर्डी | Shirdi: शहरात साकुरी शिव रस्ता या ठिकाणी राहत असलेल्या विवाहित महिलेस नणंद व सासरा यांनी सुनेस बेदम मारहाण केली. याप्रकरणी सासरा व नणंद व सासरा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 शहरात साकुरी शिव रस्ता येथे आपण पती, सासू, सासरा व लहान मुलीसोबत राहत आहे. दिनांक १८ मार्च रोजी घरी धुणे धूत असताना नणंद रेखा पूर्वेस रा. हडपसर हिने दरवाजा वाजविला असता घरात प्रवेश केला घर खाली करा घरात राहू नका असे म्हणत शिवीगाळ व लाथाबुक्यांनी मारहाण केली. रूम खाली केली नाही तर तुला व मुलीला जीवे मारून टाकू, तुझ्या पतीचे दुसरे लग्न करू  देऊ असे म्हणाली. सासरे शांतीलाल रांका हे मध्ये पडले व मारहाण केली. जीवे मारण्याची धमकी देऊन घरात कोंडून निघून गेले. अशी तक्रार १९ मार्च रोजी शिल्पा प्रदीप रांका वय ४४ यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी सासरा व नणंद यांच्या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास शिर्डी पोलीस करीत आहे.

Web Title: Shirdi beating by Sunes’s father-in-law and Nand

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here