संगमनेरात रुग्णवाहिका चालकाला बेदम मारहाण, गुन्हा दाखल
संगमनेर | Sangamner: संगमनेर शहरातील प्रांत कार्यालयाच्या मागे रुग्णवाहिका लावायच्या कारणावरून रुग्णवाहिका चालकाला बेदम मारहाण करण्यात आली.
ही घटना बुधवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी चार जणांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशोक दत्तात्रय कर्पे रा. पिंपळगाव कोन्झिरा ता. संगमनेर हा एका रुग्णवाहिकेचा चालक आहे. प्रांत कार्यालयाच्या मागे रुग्णवाहिका लावायची नाही असे म्हणून अमर गांजवे, गणेश फटांगरे, बाल्या सातपुते, सुदर्शन कुरकुटे यांनी अशोक कर्पे यास शिवीगाळ करत जबर मारहाण केली. तर अमर गांजवे याने छोट्या कटरने अशोक यांच्या पाठीत मारत जबर दुखापत केली.
याबाबत अशोक कर्पे यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी अमर गांजवे, गणेश फटांगरे, बाल्या सातपुते, सुदर्शन कुरकुटे यांच्या विरोधात गुन्हा रजिस्टर केला आहे. पुढील तपास पोलीस नाईक आरवाडे हे करीत आहे.
Web Title: Ambulance driver beaten to death in Sangamner