निंबळक बायपासवर एकाच दिवशी तीन वाहनचालकांना लुटले
अहमदनगर | Ahmednagar: निंबाळक बायपास रोड परिसरात एकाच दिवशी दोन ट्रक चालक व व कार चालकाला दमदाटी करून रोख रक्कम व मोबाईल लुटल्याची घटना घडली आहे. शुक्रवारी ही घटना घडली आहे. याप्रकरणी तोफखाना व एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
निखील मधुकर राठोड रा. औंढा नागनाथ जि. हिंगोली हा युवक मित्रासमवेत शुक्रवारी निंबळक बायपास मार्गे पुणे येथे जात होता. यावेळी मोटारसायकलवरून चार लुटारू आले. त्यांनी कारमधील दोघांना दमदाटी करून त्यांच्याकडील कार व मोबाईल हिसकावून नेला. याप्रकरणी निखील याने दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडी सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
दुसरी घटना असीम पीर बाबालाल मुल्ला रा. बारामती हे ट्रक घेऊन जात असताना निंबळक ते केडगाव मार्गे जात असताना ट्रकच्या काचा फोडून दमदाटी करत साडे चार हजार रुपये लुटून नेण्यात आले. तसेच रवींद्र मारुती खराडे यांचाही ट्रक अडवून त्यांच्याकडील ३ हजार रुपये हिसकावून नेण्यात आले. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Web Title: Ahmednagar Three drivers were robbed on the same day