Home अहमदनगर पोलीस उपनिरीक्षक तीस हजारांची लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात

पोलीस उपनिरीक्षक तीस हजारांची लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात

Jamkhed Sub-inspector of police caught taking bribe

जामखेड | Jamkhed: एका गुन्ह्याच्या तपासात मदत करण्यासाठी व तक्रारदार यांच्या भावास गुन्ह्यातून बाहेर करण्यासाठी जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सज्जन नाऱ्हेडा यांनी हॉटेल चालकाची मदत घेऊन फिर्यादीकडून ३० हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत विभागाने पकडले आहे.

याप्रकरणी हॉटेल चालक तुकाराम ढोले व पोलीस उपनिरीक्षक सज्जन नाऱ्हेडा यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पथकाने गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, याप्रकरणात तक्रारदार यांच्या भावास जामखेड गु.र.नं. ६९८/२०२० या गुन्ह्यात अटक करण्यात आलेली असून कस्टडी रिमांड घेण्यात आलेली आहे. या तपासात तक्रारदार यांच्या भावास गुन्ह्यातून बाहेर काढण्यासाठी व तपासात मदत करण्यासाठी जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सज्जन नाऱ्हेडा यांनी तक्रारदार यांच्याकडे एक लाखाची मागणी केली होती. यानंतर तडजोड करत ३० हजार देण्याचे ठरले होते. हे पैसे हॉटेल कृष्णा येथे आरोपी तुकाराम ढोले यांच्याकडे देण्यास सांगितले.

फिर्यादीने मात्र पैसे देण्याच्या अगोदर ४ जानेवारीला अहमदनगर येथील लाचलुचपत विभागात तक्रार केली. यानुसार ५ जानेवारी रोजी  अहमदनगर येथील लाचलुचपत विभागाने नगर रोडवरील हॉटेल कृष्णा या ठिकाणी सापळा रचला. त्यानुसार तक्रारदार यांच्याकडून तुकाराम ढोले यांच्याकडे ३० हजार रुपये घेतना रंगेहाथ पकडले. हॉटेल चालक तुकाराम ढोले याच्याकडे चौकशी केली असता हि रक्कम पोलीस उपनिरीक्षक सज्जन नाऱ्हेडा यांच्या सांगण्यावरून घेतली असल्याचे कबुल केले. त्यानुसार पोलीस निरीक्षक सज्जन नाऱ्हेडा यांना लाचलुचपत पथकाने अटक केली आहे.

Web Title: Jamkhed Sub-inspector of police caught taking bribe

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here