Home अहमदनगर २० वर्षीय नवविवाहितेची शेततळ्यात उडी घेऊन आत्महत्या

२० वर्षीय नवविवाहितेची शेततळ्यात उडी घेऊन आत्महत्या

Rahuri Newly Wed commit suicide by jumping on a farm

राहुरी: राहुरी तालुक्यातील चिंचविहीरे येथील २० वर्षीय नवविवाहितेने घरगुती वादातून घराशेजारील शेततळ्यात उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सहा महिन्यांपूर्वी या नव विवाहितेचे लग्न झाले होते.

सौ. योगिता उर्फ अश्विनी  गौतम नराडे वय २० रा. चिंचविहीरे असे या नवविवाहित आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे.

याबाबत राहुरी पोलिसांत मयताचे वडील अरुण दादासाहेब मिजगुले रा. कोल्हार भगवती ता. राहता यांनी राहुरी पोलीस ठाण्यात खबर दिली आहे.

मयत विवाहिता व तिचा पती यांचे ६ महिन्यांपूर्वी प्रेमसंबंधातून लग्न झाले होते. ही तरुणी गौतमच्या मामाच्या मुलगी असल्याने करोना काळात सोशियल नियम पाळून विवाह झाला होता.

मुलीचे वडील व नातेवाईक यांच्याकडून आत्महत्या प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.

दुपारी उशिरापर्यंत शवविचेदन करण्याचे काम सुरु होते. या घटनेच्या ठिकाणी पोलीस हवालदार डी. के. आव्हाड व जिल्हा परिषद सदस्य धनराज गाडे शिवसेनेचे सुरेश लांबे, सुधीर झांबरे आदी उपस्थित होते.  

Web Title: Rahuri Newly Wed commit suicide by jumping on a farm

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here