सहकार कारखान्यात अल्पवयीन मुलाचा बेल्टमध्ये अडकून मृत्यू, ठेकेदार, चीफ मॅनेजरवर गुन्हा
श्रीगोंदा | Shrigonda: श्रीगोंदा तालुक्यातील सहकारमहर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्यात १४ वर्षीय अल्पवयीन मुलाचा मशीनमधील बेल्टमध्ये अडकून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
याप्रकरणी कारखान्याचे चीफ मॅनेजर, कंत्राटदार, ठेकेदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी मधुरा जयसिंग सूर्यवंशी वय ३० (सरकारी कामगार अधिकारी सहायक कामगार आयुक्त कार्यालय अ. नगर सध्या रा. नगर) यांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. या फिर्यादीवरून कारखान्याचे चीफ इंजिनियर रामचंद्र गोविंद मखरे रा.श्रीगोंदा व आरोपी कंत्राटदार संदीप शंकर घाडगे रा. ढोकराई फाटा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मधुरा सूर्यवंशी यांनी फिर्यादीत दिलेल्या माहितीनुसार, समीर बिराजुभाई शेख वय १४ रा. श्रीगोंदा कारखाना ता. श्रीगोंदा हा अल्पवयीन मुलगा असताना माहित असूनही कामाला ठेऊन त्याच्यावर आघात झाला आहे.
दिनांक १७ रोजी ४:३० वाजेच्या सुमारास शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्यात गॅस विभागातील गॅस मशीन बेल्ट मध्ये अडकून समीर बिरजूभाई शेख गंभीर जखमी झाला. त्याला पुणे येथील हडपसर येथे उपचार करण्यासाठी दाखल करण्यात आले तेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Web Title: Shrigonda Death of a minor boy trapped in a belt